गेल्या काही दिवसांपासून अस्थिर असलेल्या शेअर बाजारात परकी गुंतवणूकदारांनी मात्र गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे. एफआयआयनी नोव्हेंबर महिन्यात शेअरच्या खरेदीचा सपाटा लावला आहे. ऑक्टोबरमध्ये परकी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेताना दिसत होते. मात्र नोव्हेंबरमध्ये हा ट्रेंड बदलला आहे. नोव्हेंबर महिन्यात मात्र हे चित्र बदलेले दिसत आहे. आतापर्यत परकी गुंतवणूकदारांनी 10,523 कोटी रुपये भारतीय बाजारात ओतले आहेत.
परकी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात तब्बल 38,906 कोटी रुपये काढून घेतले होते. यात इक्विटी, डेट आणि हायब्रिड प्रकाराचा समावेश होता. अमेरिकेतील बॉंड्समधून मिळणाऱ्या चांगल्या परताव्याचा प्रभाव परकी गुंतवणूकदारांवर होता. त्याआधी सप्टेंबर महिन्यातसुद्धा गुंतवणूक काढून घेण्यावरच परकी गुंतवणूकदारांचा कल होता.