म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ लागल्यामुळे फोलिओ क्रमांक विक्रमी 8 कोटींच्या संख्येवर पोचले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यातच तब्बल 77 लाख नवे फोलिओ नंबर जोडले गेले आहेत. यामुळे ऑक्टोबरअखेर म्युच्युअल फंडातील एकूण फोलिओ क्रमांक तब्बल 8 कोटींवर पोचले आहेत. फोलिओ क्रमांकांच्या संख्येत मागील तीन वर्षात सातत्याने वाढ होताना दिसून येते आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात 59 लाख, 2016-17 या आर्थिक वर्षात 67 लाख आणि 2017-18 या आर्थिक वर्षात घवघवीत 1.6 कोटी फोलिओंची भर म्युच्युअल फंड गुंतवणूकीत पडली आहे.
फोलिओ क्रमांक हा गुंतवणूकदारांच्या खात्याशी संलग्न असतो. एकाच गुंतवणूकदाराचे अनेक फोलिओ क्रमांक असू शकतात. अॅम्फीच्या आकडेवारीनुसार 41 म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये एकूण 8 कोटी 90 लाख 31 हजार 596 फोलिओ क्रमांक झाले आहेत

अभिप्राय द्या!

Close Menu