पॅनकार्डमधील महत्त्वाचे बदल पुढीलप्रमाणे

– संचालक, व्यवस्थापकीय संचालक, भागीदार, ट्रस्टी, लेखक, संस्थापक, कर्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), मुख्य अधिकारी या पदाधिकाऱ्यांकडे पॅनकार्ड नसल्यास त्यांनी ३१ मे २०१९ पर्यंत पॅनकार्डसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे.

  • या नियमांनुसार निवासी संस्थांसाठीही पॅन कार्ड आवश्यक असेल. आर्थिक वर्षादरम्यान संस्थेची एकूण उलाढाल, व्यवहार पावती ५ लाखांपेक्षा अधिक नसेल, तरीदेखील पॅनकार्ड क्रमांक द्यावा लागेल. यामुळे प्राप्तिकर विभागाला व्यवहारांचे परीक्षण करणे सोपे जाणार आहे. यामुळे करचुकवेगिरी रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

  • नवीन पॅनकार्डच्या अर्जातही प्राप्तिकर विभागाने काही बदल केले आहेत. पॅन कार्ड अर्जादाराची आई ही एकल माता असेल तर यापुढे संबंधित अर्जात वडिलांचं नाव नमूद न करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात वडिलांच्या नावाचा उल्लेख नसलेली पॅनकार्ड दिसू शकतील.

  • पॅनकार्ड म्हणजे प्राप्तिकर विभागाद्वारे दिलेला ओळख क्रमांक आहे. बँक खाते उघडणे, आर्थिक देवाण-घेवाण आणि प्राप्तिकर विवरणपत्र यांसारख्या व्यवहारांत त्याचा उपयोग होतो.

अभिप्राय द्या!

Close Menu