एसबीआय म्युच्युअल फंडाने नवा ‘एसबीआय – ईटीएफ क्वालिटी’ फंड बाजारात आणला आहे. एसबीआयचा हा पहिला स्मार्ट बिटा फंड आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड आहे. निफ्टी 200 क्वालिटी 30 इंडेक्समधील टॉप 30 कंपन्यांमध्ये 95 टक्के या फंडाद्वारे गुंतवणूक केली जाणार आहे. तर उर्वरित 5 टक्के गुंतवणूक मनी मार्केटमध्ये केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी 26 नोव्हेंबर रोजी खुला झाला आहे आणि 3 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. या फंडातील गुंतवणूकीसाठी कोणताही एन्ट्री लोड आणि एक्झिट लोड नाही.
निफ्टी 200 क्वालिटी 30 इंडेक्समधील कंपन्यांचे गुणांकन केले जाणार आहे. त्यासाठी तीन निकष मुख्यत्वे वापरले जाणार आहे. कंपनीची नफा कमावण्याची क्षमता, भांडवलाच्या तुलनेत कंपनीवर असलेले कर्ज आणि कंपनीची उत्पन्न मिळवण्याची क्षमता या घटकांच्या आधारे कंपन्यांचे गुणांकन केले जाणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन रविप्रकाश शर्मा करणार आहेत. ते सीए असून त्यांना या क्षेत्रातील 18 वर्षांचा अनूभव आहे.

अभिप्राय द्या!