बहुतेक छोटे गुंतवणूकदार हे शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूक करायला सुरवात करतात आणि जरा अस्थिरता दिसली, की घाईघाईने त्यातून बाहेर पडतात. म्युच्युअल फंडाचे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (एसआयपी) हे बाजारपेठेच्या अस्थिरतेचा फायदा करून देणारे सर्वांत योग्य साधन आहे. 

म्युच्युअल फंडाचे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (एसआयपी) हे तुम्हाला बाजारपेठेच्या अस्थिरतेचा फायदा करून देणारे सर्वांत योग्य साधन आहे. म्युच्युअल फंड योजनेतील या सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे बाजारपेठेत तेजी असताना कमी युनिट्‌स आणि मंदी असताना जास्त युनिट्‌स खरेदी केले जातात. या प्रक्रियेमध्ये कालांतराने युनिट्‌स खरेदी करण्याची सरासरी किंमत कमी होते आणि तुम्हाला नियमितपणे केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होतो. अस्थिर बाजारपेठेत ‘एसआयपी’ थांबविण्याची किंवा ‘एसआयपी’मधून बाहेर पडण्याची वृत्ती आढळून येते. मात्र, याच्या अगदी उलट करायला आहे म्हणजेच ‘एसआयपी’ सुरूच ठेवायला हवी आणि शक्‍य असल्यास अतिरिक्त गुंतवणूक करायला हवी.  
 
कामगिरीचे विश्‍लेषण करा!
गुंतवणूकदारांमध्ये कायम आढळून येणारी एक चुकीची सवय म्हणजे ते त्यांच्या गुंतवणुकीच्या कामगिरीची तुलना इतर प्रकारच्या योजनांच्या कामगिरीशी करतात. लार्ज कॅप इक्विटी योजनेतील गुंतवणुकीची तुलना त्याच योजनेच्या मापदंडाशी किंवा इतर लार्ज कॅप योजनांशीच केली गेली पाहिजे. म्युच्युअल फंडातील वैयक्तिक गुंतवणुकीची तुलना दुसऱ्या ॲसेट क्‍लासशी म्हणजे सोने अथवा स्थावर मालमत्तेशी केल्यास मनात विनाकारण भीती निर्माण होते व ती भीती तुमच्या दीर्घकालीन गुंतवणूक योजनांवर परिणाम करते. जर, तुमचा पोर्टफोलिओ ॲसेट क्‍लासच्या बाजूने असंतुलित झाला असेल, तर आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन तो पूर्ववत करा. अस्थिर बाजारपेठेत असे करणे जास्त महत्त्वाचे असते.

अभिप्राय द्या!