साधा टाईप केले संदेश, त्यानंतर व्हिडीओ, व्हिडीओ कॉलिंग, स्टेट्सचे नवनवीन फीचर्स अशा टप्याटप्याने सुविधा देऊन भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या व्हॉट्सअपवरून लवकरच पैसे देखील पाठविले जाणार आहेत. यासंदर्भात, व्हॉट्सअपच्या प्रमुखांनी आरबीआयला पत्र लिहून पेमेंट सेवेच्या विस्तारासाठी परवानगी मागितली आहे.
व्हॉट्सअपने 10 लाख वापरकर्त्यांच्या माध्यमातून पेमेंटच्या सेवेची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर दोन वर्षानंतर पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरबीआयला व्हॉट्सअपचे प्रमुख ख्रिस डॅनियल्स यांनी पत्र लिहून पेमेंट सेवेची देशात चाचणी घेत असल्याची माहिती दिली असून डॅनियल्स यांनी पत्रात ही सेवा सुरक्षित आणि उपयुक्त असल्याची ग्वाही दिली आहे. वित्तीय समावेशकता (Financial inclusion ) आणि डिजीटल सक्षमीकरणाने भारतीयांचे जीवनमान सुधारेल असेल, असा विश्वासही त्यांनी आरबीआयला पत्रातून दिला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu