स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे.

आतापर्यंत दरमहा पाच ते सात एटीएम मोफत व्यवहार करण्याची ग्राहकांना सवलत होती. मात्र, आता ग्राहकांना दरमहा अमर्यादित एटीएम व्यवहार करण्याची मुभा स्टेट बँकेतर्फे देण्यात आली आहे. त्यासाठी खात्यामध्ये किमान २५ हजारांची रक्कम राखण्याची अट घालण्यात आली आहे. आपल्या ग्राहकांना दरमहा ठरावीक एटीएम व्यवहार मोफत देण्याचे निर्देश नुकतेच रिझर्व्ह बँकेने दिले होते. या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

स्टेट बँकेच्या ज्या ग्राहकांना दरमहा अमर्याद एटीएम व्यवहार करण्याची इच्छा आहे, त्यांना आपल्या बचत खात्यामध्ये दरमहा ठरावीक रक्कम राखण्याची आवश्यकता आहे. किमान रक्कम खात्यात बाळगणाऱ्या ग्राहकांना स्टेट बँक समूहाच्या आणि अन्य बँकांच्याही एटीएमवरही अमर्याद मोफत व्यवहार करता येणार असल्याचे बँकेतर्फे कळविण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर २०१८पासून स्टेट बँकेने आपल्या ‘क्लासिक’ आणि ‘माइस्ट्रो’ या डेबिट कार्डधारकांसाठी एटीएममधून रक्कम काढण्याची दैनंदिन मर्यादा ४० हजार रुपयांवरून २० हजार रुपयांवर आणली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu