सूचिबद्ध कंपन्यांचे कागदी स्वरूपातील समभाग हस्तांतर करण्यास ‘सेबी’ने मनाई केली आहे. पाच डिसेंबरपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्या नावे असलेले कागदी स्वरूपातील समभाग अन्य कोणास हस्तांतर करायचे असल्यास (ट्रान्स्फर ऑफ शेअर्स) हा व्यवहार केवळ डीमॅट खात्याच्या माध्यमातूनच करता येईल, असे ‘सेबी’ने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत समभागांची हस्तांतरण प्रक्रिया डीमॅटव्यतिरिक्त कागदोपत्री करण्याचीही परवानगी होती. मात्र या व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव असल्याने सेबीने हा नवा नियम जारी केला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu