येस बॅंकेचीच एक उपकंपनी येस अॅसेट मॅनेजमेंटला सेबीने म्युच्युअल फंड व्यवसायात आपल्या योजना बाजारात आणण्याची परवानगी दिली आहे. सेबीने येस बॅंकेच्या दोन म्यु्च्युअल फंड योजनांना परवानगी दिली आहे. देशात सध्या 40 पेक्षा जास्त म्यु्चुयअल फंड कंपन्या आहेत. त्यात आता येस बॅंकेची भर पडणार आहे. येस बॅंक आपल्या दोन नवीन योजना बाजारात आणणार आहे.
येस लिक्विड फंड आणि येस अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड अशा या दोन योजना असणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेला म्युच्युअल फंड योजना बाजारात आणण्याची परवानगी दिल्यानंतर सेबीने ही परवानगी दिली आहे. याआधीच जुलै महिन्यात सेबीने येस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी दरवाजे खुले केले होते.