पुढील आर्थिक वर्षापासून गृहकर्जांचे व्याजदर बाजारभावाशी जोडण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सध्या सीटी बँक वगळता कोणतीच बँक बाजारभावानुसार गृहकर्जाचे व्याजदर ठरवत नाहीत.
बाजारभाव वाढले की बँकांचे व्याजदर वाढतात. पण बाजारभाव घटले की व्याजदर कमी होत नाही. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक गेल्या अनेक वर्षांपासून रेपो रेट आणि गृहकर्जाचे व्याजदर बाजारभावाशी जोडण्याचा विचार करत होती. त्याची आता अंमलबजावणी होणार आहे. व्याजदरांसाठी बाजारभावाचा निकष वापरल्यास व्यवहारात पारदर्शकता येईल. बाजाराचा कानोसा घेऊन राष्ट्रीयीकृत बँकांना ग्राहकांसाठी व्याजदरांची आखणी करता येईल.