नोव्हेंबर महिन्यात लिक्विड फंडात चांगली गुंतवणूक झाल्याचे दिसून आले आहे. लिक्विड फंडातील गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक गुंतवणूक नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक लिक्विड फंडात केली आहे. ऑगस्टनंतरची लिक्विड फंड प्रकारातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. गेल्या महिन्यातच आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी या फंड प्रकारातून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला होता. 2007 नंतर काढून घेतलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक रक्कम होती.
आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक अरिष्टाचे सावट हळूहळू दूर होत गुंतवणूकदारांची चिंता कमी होत ते आता मनी मार्केटकडे परत वळू लागले आहेत. आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक संकटाने लिक्विड फंडसुद्धा एका पातळीवर जोखमीचे आहेत ही बाब गुंतवणूकदारांसमोर आणली आहे. लिक्विड फंडातील एकूण गुंतवणूक तब्बल 23 ट्रिलियन रुपये इतकी आहे. वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारात ही रकक्म चौथ्या क्रमांकावर आहे. अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी आयएल अॅंड एफएसच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केली होती. त्यामुळे म्युच्युअल फंड व्यवसायातही आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक अरिष्टाचा तणाव निर्माण झाला होता.

अभिप्राय द्या!