आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड (पूर्वीची बिर्ला सन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनी) या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (पूर्वीची आदित्य बिर्ला फायनान्शियल सर्व्हिसेस लि.) आणि आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाची गुंतवणूक व्यवस्थापक (एबीएसएलएमएफ) यांनी बिर्ला सन लाइफ निफ्टी नेक्स्ट ५० ईटीएफ (ईटीएफ) ही निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सचा मागोवा घेणारी ओपन एंडेड योजना लाँच केल्याचे जाहीर केले आहे.

नव्या फंड योजनेची नोंदणी ११ डिसेंबर २०१८ रोजी सुरू होणार असून १७ डिसेंबर २०१८ रोजी बंद होणार आहे. ही ईटीएफ विक्रीसाठी सातत्याने परत खुली होणआर असून वाटपानंतर कामकाडाच्या पाच दिवसांत पुनर्खरेदी केली जाणार आहे. निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सने प्रतिनिधीत्व केलेल्या सिक्युरिटीजच्या त्यातील ट्रॅकिंग चुका धरून एकूण परताव्यांशी सुसंगत परतावे देणे हे या योजनेचे गुंतवणूक ध्येय आहे.

या लाँचविषयी ए. बालासुब्र्हमण्यम, मुख्य कार्यकारी अधिकारी, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड म्हणाले, निफ्टी ५० आणि निफ्टी नेक्स्ट ५० मधील स्टॉक्स मिळून लार्ज कॅप परिघातील सर्वात प्रवाही १०० स्टॉक्सची यादी तया करतात. निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स विकासाची आणि उंचावण्याची क्षमता असलेल्या स्टॉक्सवर भर देते. अशाप्रकारे भारताच्या विकासकहाणीचा लाभ घेणारा हा आकर्षक प्रस्ताव आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये

 

·         ११ डिसेंबर २०१८ पासून नोंदणीस सुरुवात १७ डिसेंबर २०१८ रोजी बंद होणार

·         पुढील निफ्टी ५० च्या खालील ५० स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी

·         योजनेच्या युनिट्सची नोंदणी बीएसई आणि एनएसईवर

·         पुरेसे वैविध्यकरण पुरवणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांत इंडेक्सचा विस्तार

·         आगमन आणि निर्गमन भार नाही

 

अभिप्राय द्या!