टाटा म्युच्युअल फंडाने नवा टाटा आर्ब्रिट्राज फंड बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड, इक्विटी प्रकारातील फंड आहे. या फंडाद्वारे कॅश आणि डेरिव्हेटिव्ह या इक्विटीच्या उपप्रकारांमध्ये मुख्यत: गुंतवणूक केली जाणार आहे. त्याचबरोबर डेट आणि मनी मार्केटसारख्या प्रकारांमध्येही गुंतवणूक करून समतोल साधला जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी 10 डिसेंबर खुला झाला असून 17 डिसेंबर ही त्याची अंतिम मुदत आहे. या फंडात गुंतवणूक करण्यासाठीची किमान गुंतवणूक रक्कम 5,000 रुपये इतकी आहे. या फंडाचे व्यवस्थापन शैलेश जैन करणार आहेत. 

अभिप्राय द्या!