देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या विकासकामांमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळते आहे. परिणामी औद्योगिक उत्पादनात वाढ नोंदविण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादनातील वाढ ऑक्‍टोबरमध्ये 8.1 टक्‍क्‍यांवर पोचली असून, ही मागील अकरा महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. खाण, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि उत्पादन क्षेत्राची चांगली कामगिरी याला कारणीभूत ठरली आहे.
 
केंद्रीय सांख्यिकी विभागाने आज ही आकडेवारी जाहीर केली. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या आधारे औद्योगिक उत्पादन मोजले जाते. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये औद्योगिक उत्पादनातील वाढ 1.8 टक्के होती. चालू वर्षी ऑक्‍टोबरमध्ये ही वाढ 8.1 टक्के आहे. ही मागील 11 महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनातील वाढ 8.5 टक्के होती. चालू वर्षी सप्टेंबर महिन्यात ही वाढ 4.5 टक्के होती. एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळातील ही वाढ 5.6 टक्के असून, मागील वर्षी याच काळात ती 2.5 टक्के होती. 

अभिप्राय द्या!

Close Menu