म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 लाख कोटी रुपयांचा ओघ म्युच्युअल फंडांकडे वळविला आहे. 
 
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडियाने (ऍम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड योजनांमधील चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांतील (एप्रिल-नोव्हेंबर) गुंतवणूक आता 2.23 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. अशा प्रकारे चालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये विक्रमी गुंतवणूक होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. शेअर बाजारात घसरणीचे वारे असून देखील गुंतवणूकदारांनी इक्विटी आणि डेट योजनांना पसंती दिल्याचे समोर आले आहे. बॅंकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये दिवसेंदिवस कपात होत असल्याने गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाकडे ओढा वळविला आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना भौतिक मालमत्तांकडून आर्थिक मालमत्तांकडे वळण्यास मदत होऊ लागली आहे. 

अभिप्राय द्या!