आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने एक अभिनव सुविधा आपल्या गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. गुगल व्हॉईसवर आधारित नवी ‘चॅट बोट’ गुंतवणूक सेवा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने लॉंच केली आहे. या सुविधेला नॅचरल लॅग्वेज प्रोसेसिंगचाही आधार असणार आहे. ही सुविधा नव्या ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर आयसीआयसीआयच्या वेगवेगळ्या म्युच्युअल फंडामंध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही सुविधा ग्राहकांच्या दिमतीला असणार आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या जुन्या गुंतवणूकदारांना आपल्या ट्रॅन्झॅक्शनसाठी किंवा असलेल्या फोलिओत एसआयपी नोंदवण्यासाठीही या ‘चॅट बोट’ गुंतवणूक सेवेचा वापर करता येणार आहे.
त्याचबरोबर ‘चॅट बोट’ या सुविधेचे आखणी अशी पद्धतीने करण्यात आली आहे की ही सुविधा वापरताना जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर गुंतवणूकदारांचा यासंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या एजंटशी ऑटोमेटीक संपर्क घडवून दिला जाणार आहे.
‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा सातत्याने नाविन्यपूर्ण सुविधा गुंतवणूकदारांना पुरवण्याचा प्रयत्न असतो. नवी व्हॉईसवर आधारीत ‘चॅट बोट’  सुविधेमुळे गुंतवणूकदारांना आणखी सुलभरित्या ऑनलाईन गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.

अभिप्राय द्या!