संपूर्ण आर्थिक नियोजनामध्ये कर नियोजन हा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु बऱ्याचदा असे लक्षात येते की आपण कर वाचतो म्हणून एखादी गुंतवणूक करतो. मला अनेकजण असे भेटले आहेत ज्यांनी कर वाचवण्यासाठी आपल्या आर्थिक गरजा न समजून घेता किंवा घाईघाईमधे चुकीच्या गुंतवणूक पर्यायांमधे गुंतवणूक केली आणि मग पस्तावले. प्रत्येक गुंतवणूक पर्यायाचा सर्वांगीण विचार न करता फक्त कर कुशलता पाहून त्यात गुंतवणूक करणे म्हणजे आपल्या मुलाला चुकीच्या शाळेत बसवण्यासारखं आहे. कधी तरी पास होईल या अपेक्षेने आपण मुलाला पुढच्या इयत्तेत घालतो का? तिथे आपण त्याच्या क्षमतेचा, त्या बोर्डाच्या अभ्यासामुळे भविष्यात होणाऱ्या फायद्याचा आणि आपल्याला झेपणाऱ्या खर्चाचा विचार करतोच. तर मग कर वाचवतानासुद्धा आपल्याला नक्की काय हवंय हे तपासल्याशिवाय गुंतवणूक का करायची?

म्हणून हे वाचाच

  • आपले काही खर्च कर वाचवायला मदत करतात, त्यांची नोंद सर्वप्रथम घ्या. उदा. मुलांची शाळा-कॉलेजची फी, गृहकर्जाची मुद्दल, विम्याचे हप्ते, नवीन घराची स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन फी, आरोग्य विमा हप्ते, हेल्थ चेक-अप खर्च, आर्थिकरीत्या निर्भर असणारे दिव्यांग कुटुंबीयांचा आरोग्य खर्च किंवा विशिष्ट विमा योजनेत केलेलं योगदान, घर भाडे, काही ठराविक आजारांवर होणारा आरोग्य खर्च (कॅन्सर, एड्स, डिमेन्शिया इ.), शैक्षणिक कर्जाचे व्याज, आर्थिक मदत.
  •  कर्ज वाचवणारे गुंतवणूक पर्याय निवडताना त्यांची रोकड सुलभता, जोखीम, परतावे आणि कर कार्यक्षमता समजून घ्या. उदाहरण म्हणून वरील तक्ता पाहा.
  • गुंतवणूक करायच्या आधी तुमच्या नजीकच्या काळातील आर्थिक ध्येयांचा आढावा घ्या. कदाचित गुंतवणूक केल्यास तुम्हाला पैसे कमी पडायची शक्यता असेल. उदा. – शिक्षणाचा मोठा खर्च, कुटुंबात एखादा मोठा आरोग्य खर्च, घर घेण्यासाठी स्वत:चं योगदान वगैरे.
  • व या सर्वांचा आढावा घेऊन ELSS हया करबचत करणाऱ्या म्युच्युअल फंडाची निवड कराच !!

अभिप्राय द्या!