बिगर बँकिंग वित्त संस्था कॅपिटल फर्स्ट आणि आयडीएफसी बँकेचे विलीनीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती दोन्ही कंपन्यांच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. तसेच भागधारकांची मंजुरी मिळताच ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ म्हणून कामकाजाला सुरुवात होऊन कॅपिटल फर्स्टचे संस्थापक -अध्यक्ष व्ही वैद्यनाथ बँकेचे एमडी आणि सीईओ पदाची सूत्रे हाती घेतील.
दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित येण्यामुळे आयडीएफसी बँकेला ‘रिटेल’ आणि ‘व्होलसेल’ प्रकारात विविध प्रकारची उत्पादने / ऑफर्स सादर करता येणार आहेत. तसेच दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर 203 बँक शाखा, 129 एटीएम आणि 454 ग्रामीण व्यापार प्रतिनिधी केंद्रांद्वारे बँक 72 लाख ग्राहकांना सेवा पुरवेल.
12 जानेवारी 2018 रोजी कंपन्यांच्या एकत्रीकरणाला सुरुवात झाली होती. शेअरधारकाला 10 कॅपिटल फर्स्टच्या शेअर्सच्या बदल्यात आयडीएफसीचे 139 शेअर्स देण्यात आले आहेत.

अभिप्राय द्या!