तेल व वायू विपणन व विक्री क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ऑइल अँड नॅच्युरल गॅसच्या (ओएनजीसी) संचालक मंडळाने 4,022 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकला मंजूर दिली आहे. यासंदर्भात कंपनीने नियामक संस्था सेबीला ही माहिती सादर केली आहे. बायबॅक अंतर्गत कंपनी एकूण शेअर अलॉटमेंटच्या 1.97 टक्के किंवा 25.29 कोटी शेअर्सची पुनर्खरेदी करणार आहे. यासाठी कंपनीने एका शेअरचे मूल्य 159 रुपये ठरविले आहे. आज कंपनीचा शेअर 148 रुपयांवर व्यवहार करत  होता.
ज्या कंपन्यांचे महसुली उत्पन्न चांगले आहे अशा कंपन्यांमार्फत बायबॅक किंवा शेअर्स धारकांना डिव्हीडंड देऊन सरकार वित्तीय तूट बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे.
या अगोदर, मागील आठवड्यात इंडियन ऑयल कारपोरेशनने (आईओसी) देखील 4,435 कोटी रुपयांचा शेअर बायबॅक जाहीर केला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu