जीएसटी कररचनेतील सुधारणा
आणखी पुढे नेत जीएसटी कौन्सिल भविष्यातही सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. महसूलात वाढ होत गेल्यावर देशात दैनंदिन वापरातील वस्तूंवर जीएसटीचा 0 टक्के, 5 टक्के आणि 12 -18 टक्क्यांचा स्टॅंडर्ड रेट लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची घोषणा केली आहे. सध्या चैनीच्या आणि तंबाखू, मद्य यासंदर्भातील वस्तू जीएसटीच्या सर्वाधिक कर श्रेणी प्रकारात आहेत. जीएसटी अंतर्गत एकूण 1,216 वस्तू येतात. त्यातील 183 0 टक्के, 308 वस्तू 5 टक्के, 178 वस्तू 12 टक्के आणि 517 वस्तू 18 टक्के श्रेणीत येतात.
28 टक्क्यांची श्रेणी ही लवकरच रद्द होणार आहे. सध्या सरकारने फक्त 28 टक्के वस्तू 28 टक्के श्रेणीत ठेवल्या आहेत. केंद्र सरकार सध्या जीएसटीतील सुधारणा करण्याच्या प्रक्रियेत आहे. भविष्यात 12 ते 18 टक्क्यांच्या दरम्यानच्या श्रेणीत बहुतांश वस्तू आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे वरच्या 28 टक्क्यांची श्रेणीच रद्द होणार आहे.
सरकारचे पुढचे प्राधान्य सिमेंटला खालच्या कर श्रेणीत आणण्याचे असणार आहे.

अभिप्राय द्या!