पिरामल एंटरप्राईझेस लि. ही पिरामल समूहाची सर्वात मोठी कंपनी नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सच्या माध्यमातून 2,500 कोटी रुपयांचे भांडवल उभे करणार आहे. पिरामल एंटरप्राईझेसच्या संचालक मंडळाच्या प्रशासकीय समितीने यासंदर्भातील परवानगी दिली आहे. कंपनी 25,000 रिडिमेबल नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्स प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या दर्शनी मूल्याने बाजारात आणणार आहे. मुंबई शेअर बाजाराकडे पिरामल एंटरप्राईझेसने यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील पतमानांकन संस्था आयसीआरएने पिरामल एंटरप्राईझेस लि.ला ‘एए’ मानांकन दिले आहे. पिरामल एंटरप्राईझेस लि. आपल्या अनूभवातून आणि मागील उत्तम कामगिरीच्या जोरावर चांगला नफा मिळवू शकेल, असे मत आयसीआरएने व्यक्त केले आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu