अहमदाबाद येथील प्लास्टिक, पाईप, चिकटवण्यासाठी उपयुक्त सोल्यशन्सचा व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीने पाच वर्षात दणदणीत परतावा दिला आहे. अॅस्ट्रल पॉली टेक्निक या कंपनीने पाच वर्षात 562 टक्क्यांचा भरघोस परतावा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे आज 6.50 लाख रुपये झाले आहेत. यामुळे या कंपनीत गुंतवणूक केलेले गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजारात अॅस्ट्रल पॉली टेक्निकचा शेअर 1120.00 रुपये प्रति शेअर या पातळीवर आहे. 
 
पाच वर्षांपूर्वी याच शेअरची किंमत 161.18 रुपये प्रति शेअर इतकी होती. या कंपनीच्या व्यवसायात 2013 पासून सातत्याने वाढ झाली आहे. मार्च 2013 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीची विक्री 825.20 कोटी रुपयांची होती. तर मार्च 2018 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीचा व्यवसाय 2,138.87 कोटी रुपयांवर पोचला आहे. याच कालावधीत अॅस्ट्रल पॉली टेक्निकचा निव्वळ नफा 60.61 कोटी रुपयांवरून 178.32 कोटी रुपयांवर पोचला आहे. कंपनीच्या दर्शनी किंमतीतसुद्धा चांगलीच वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीचे दर्शनी मूल्य 84.79 वर पोचले आहे. मार्च 2013 अखेर कंपनीचे दर्शनी मूल्य 21.37 इतके होते.  
 
अॅस्ट्रल पॉली टेक्निकचे उत्पादन प्रकल्प भारताबरोबरच परदेशातसुद्धा आहेत. भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतसुद्धा कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. पीव्हीसी पाईप, औद्योगिक प्लास्टिक उत्पादने, सुरक्षा उपकरणे, प्लंबिंगशी संबंधित उत्पादने, सिलिकॉन टेप, वॉटरप्रूफींग सोल्यूशन्स, बांधकामासाठीचे केमिकल्स, टाईल्स चिटकवण्यासाठीचे केमिकल इत्यादी असंख्य उत्पादनांचा अॅस्ट्रल पॉली टेक्निकच्या व्यवसायात समावेश आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu