भारतीय कंपन्यांनी 2018 मध्ये नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सद्वारे (एनसीडी) तब्बल 29,300 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात तिप्पटीने वाढ झाली आहे. नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्स तुलनात्मकरित्या कन्व्हर्टीबल डिबेंचर्सपेक्षा जास्त व्याज देतात. सेबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय कंपन्यांनी उभ्या केलेल्या नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. या वर्षी कंपन्यांनी 29,300 कोटी रुपये उभारले आहेत. तर मागील वर्षी नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सच्या माध्यमातून 9,779 कोटी रुपये उभारण्यात आले होते. 
 
मुथ्थूट फायनान्स, कोसामट्टम फायनान्स, एसआरईआय इक्यूपमेंट फायनान्स, दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉ. जेएम फायनान्शियल क्रेडीट सोल्यूशन्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी, ईसीएल फायनान्स, इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, आधार हाऊसिंग फायनान्स, मन्नापुरम फायनान्स आणि केएलएम एक्सिव्हा फिनव्हेस्ट या कंपन्यांनी 2018 मध्ये नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सद्वारे मोठ्या भांडवलाची उभारणी केली. दिवाण हाऊसिंगने 3,000 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवत तब्बल 10,945 कोटी रुपयांची उभारणी केली. तर टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसने 3,373 कोटी रुपयांचे भांडवल उभारले

अभिप्राय द्या!