आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स ही व्हॉट्सअॅपशी थेट एकात्मिकरण करणारी भारतातील पहिली लाइफ इन्शुरन्स कंपनी ठरली आहे. यामुळे कंपनीला या जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग सुविधेवर व्हेरिफाइड बिझनेस अकाउंट उघडणे शक्य झाले आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ व्हॉट्सअॅप मेसेजिंग सुविधेचा वापर ग्राहकांना सेवा देण्याचे एक माध्यम म्हणून करणार आहे.
ग्राहकांना त्यांच्या लाइफ इन्शुरन्स योजनांचा तपशील सहज उपलब्ध होण्यासाठी कंपनीने अवलंबलेला हा सर्वात मोठा डिजिटल उपक्रम आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज मिळण्याची परवानगी देणाऱ्या ग्राहकांना वेलकम किट, योजना प्रमाणपत्र, प्रीमिअम रिसिट व अन्य अनेक सेवा उपलब्ध होतील. मेसेजिंग सुविधेवर वापरल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील एन्क्रिप्शनमुळे, ग्राहकाकडून मिळालेली व ग्राहकाला दिलेली माहिती गोपनीय राखली जाते.