महिंद्रा अॅंड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लवकरच नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्स (एनसीडी) बाजारात आणणार आहे. एनसीडीचा हा इश्यू 4 जानेवारी 2019ला बाजारात येणार असून त्याची अंतिम तारीख 25 जानेवारी असणार आहे. महिंद्रा अॅंड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसचे या एनसीडीद्वारे 3,500 कोटी रुपयांचे भांडवल उभे करण्याचे उद्दिष्ट आहे. एनसीडीचा हा पहिला टप्पा मुंबई शेअर बाजारात नोंदवला जाणार आहे.
या एनसीडीमध्ये निश्चित व्याजदर दिला जाणार आहे. या एनसीडीचे चार प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. सेरिज I (39 महिने), सेरिज II (60 महिने) , सेरिज III (96 महिने), सेरिज IV (120 महिने) अशा चार प्रकारात गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार आहे. सेरिज I, सेरिज II, सेरिज III, सेरिज IV साठी अनुक्रमे 9.05 टक्के, 9.15 टक्के, 9.30 टक्के, 9.50 टक्के वार्षिक व्याज दिले जाणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu