कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष कोट्याअंतर्गत शेअर्स विक्री करून देशातील आघाडीची सार्वजनिक बँक असलेली युनियन बँक ऑफ इंडिया 600 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. काल ‘स्टेकहोल्डर्स रिलेशनशिप कमिटी’च्या  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कमिटीने ‘युनियन बँक ऑफ इंडिया-कर्मचारी शेअर खरेदी योजना’ मंजूर केली आहे. याअंतर्गत पात्र कर्मचार्यांना तब्बल 8 कोटी नवीन शेअर्स खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात येतील.
या अगोदर सिंडिकेट बँकेने देखील कर्मचाऱ्यांना शेअर्स इश्यू करून 500 कोटी रुपये उभारणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, विजया बँक देखील 5 कोटी रुपयांचे भांडवल अशाच पद्धतीने जमा करणार आहे.
सकाळच्या सत्रात युनियन बँक ऑफ इंडियाचा शेअर 2.50 टक्क्यांनी वधारून 91.15 रुपयांवर व्यवहार करत आहे.

अभिप्राय द्या!