चालू आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये देशाचा आर्थिक वृद्धी दर (जीडीपी) 7.2 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जी मागील वर्षाच्या (2017-218) च्या तुलनेत (6.7 %) चांगली असणार आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून 2018 या कालावधीत जीडीपी कधीच दर लक्षणीय 8.2 टक्के इतका होता. तर दुसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर 2018 या काळात हा दर 7.1 टक्क्यांवर घसरला.
चालू वर्षात मध्ये वीज, गॅस, पाणी पुरवठा त्याचबरोबर, बांधकाम, उत्पादन आणि सार्वजनिक प्रशासन, संरक्षण इत्यादी क्षेत्रांचा विकास दर 7 टक्क्यांपेक्षा   अधिक असण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu