मागील दोन सत्रांपासून सकारात्मक वाटचाल करीत असलेला भारतीय शेअर बाजार आज देखील तेजीत बंद झाला. आज मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 130 अंशांची वाढ होऊन 35,980 वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेर बाजार निर्देशांक निफ्टी 30 अंशांच्या तेजीने 10,802 वर स्थिरावला.
शेअर वधारले: सनफार्म, आयसीआयसीआय बँक,एसबीआय , येस बँक, टाटा मोटर्स, ऍक्सिस बँक
शेअर्स घसरले: कोटक बँक, एनटीपीसी, एचडीएफसी
आज विशेष
भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची तेजी
भारत डायनॅमिक्स लिमिटेडला भारतीय लष्कराकडून अँटी-टँक मार्गदर्शित मिसाईल (एटीजीएम) आणि लॉन्चर्सची पुरवठा करण्यासाठी 760 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याने कंपनीच्या शेअरमध्ये 9 .5 टक्क्यांनी वाढ होऊन शेअर 304.90 रुपयांवर पोचला होता.
बंधन बँक – गृह फायनान्स
बंधन बँक – गृह फायनान्स यांच्यात ‘शेअर स्वॅप रेशो’ नुसार 81,800 कोटींचा करार झाल्यानंतर बंधन बँकेचा शेअर 3.68 टक्क्यांनी घसरून 479.70 वर बंद झाला. तर, एचडीएफसी बँकेचा मोठा वाट असलेल्या गृह फायनान्सचा शेअर 16.60 टक्क्यांनी घसरून 255.50 वर स्थिरावला. या करारानुसार, गृह फायनान्सच्या गुंतवणूकदारांना बंधन बँकेच्या प्रत्येकी 1,000 शेअर्समागे 568 शेअर्स मिळणार आहेत.
मॉन्सेंटो इंडियाच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांनी वाढ
सुप्रीम कोर्टाने मॉन्सेंटो इंडियाच्या बीटी कॉटन (जीएम) उत्पादनाच्या पेटंटला ग्राह्य मानत मंजुरी दिल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांनी वाढून 2,917 रुपयांवर पोचला होता. मात्र दिवसाच्या शेवटी कंपनीचा शेअर 2,630 वर स्थिरावला.