अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज 32 व्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक पार पडली. बैठकीमध्ये प्रामुख्याने बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी जीएसटी कर पुनर्रचनेबद्दल चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार, निर्माणाधीन (अंडर कन्स्ट्रक्शन) असलेल्या घर व फ्लॅटच्या खरेदीवर 12 टक्के असलेला जीएसटी 5 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे.
सध्या असा आहे बांधकाम क्षेत्रावर कर
बांधकाम पूर्ण झालेल्या स्थावर मालमत्तेची खरेदी करणाऱ्यांना जीएसटीपोटी कोणताही कर नाही. बांधकामाला पुरविण्यात येणाऱ्या मटेरियल आणि इतर सेवांवर 18 टक्के जीएसटी कर लागू होतो. सिमेंटवर 28 टक्के कर आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी निर्माणाधीन गृहप्रकल्पांवर 4.5 टक्के सेवा कर आणि 1 ते 5 टक्के व्हॅट लावण्यात येत होता. तसेच अतिरिक्त उत्पादन शुल्क हे 12.5 ते 15.5 लागू करण्यात येत होते. तसेच सुरुवातीला लेव्ही कर लागू करण्यात येत होता. सध्या जीएसटीचा बांधकाम क्षेत्रावर एकूण 15 ते 18 टक्के कर लागू आहे. जवाहरलाल नेहरु नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन, राजीव आवास योजना, प्रधान मंत्री आवास योजना अशा सरकारी प्रकल्पावरही 8 टक्के जीएसटी लागू आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu