देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 8 हजार 105 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. निव्वळ नफ्यात 24.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 6 हजार 531 कोटी रुपयांचा नफा झाला होता. टाटा समूहाच्या एकूण नफ्यात टीसीएसचा मोठा वाटा आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 20.8 टक्क्यांनी वाढून 37 हजार 338 कोटी रुपयांवर पोचला आहे, जो गेल्यावर्षी याच काळात 30 हजार 904 कोटी रुपये होता.

अभिप्राय द्या!

Close Menu