एलआयसी म्युच्युअल फंडाने नवा ‘एलआयसी शॉर्ट टर्म डेट फंड‘ बाजारात आणला आहे. हा फंड ओपन एंडेड शॉर्ट टर्म फंड आहे. 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना डोळ्यासमोर ठेऊन हा फंड बाजारात आणण्यात आला आहे. या एनएफओची ऑफर अंतिम मुदत 25 जानेवारी आहे. या फंडाचे व्यवस्थापन मर्झबान इराणी करणार आहेत. गुंतवणूकीच्या जोखमीच्या तुलनेत परतावा मिळवून देण्याचे या फंडाचे उद्दीष्ट आहे.
फंड मॅनेजर क्रेडीट रेटींग एजन्सीने दिलेल्या मानांकनाच्या आधारात डेट प्रकारात गुंतवणूक करणार आहे. व्याजदर, व्याजदराची रचना, रोकडेची उपलब्धता, रिझर्व्ह बॅंकेचे धोरण, वाढत्या अपेक्षा, वित्तीय तूट, जागतिक व्याजदर, चलनवाढ या सारखे मुद्दे लक्षात घेऊन फंड मॅनेजर या फंडाद्वारे गुंतवणूक करणार आहे. मध्यम कालावधीसाठी चांगला किंवा मर्यादीत परतावा मिळण्याची अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड चांगला पर्याय ठरू शकतो असे मत एलआयसी म्युच्युअल फंड हाऊसने व्यक्त केले आहे.