अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि सल्लागार इवांका ट्रम्प या लवकरच जागतिक बँकेच्या अध्यक्ष बनू शकतात. जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या आतच राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्षांसाठी शोध सुरु झाला आहे. नवीन अध्यक्षपदासाठी जी नावे चर्चेत आहेत त्यांमध्ये इवांका ट्रम्प यांचे देखील नाव जोडले गेले आहे.
शुक्रवारी द फायनान्शियल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार इवांका ट्रम्प यांच्याबरोबरच संयुक्त राष्ट्रसंघामध्ये अमेरिकेच्या राजदूत असलेल्या निकी हॅले यांचे नाव देखील विशेष चर्चेत आहे. त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय बाबींसाठी ट्रेझरी अंडरसेक्रेटरी असलेले डेव्हिड मालपस आणि यूएस एजन्सीचे  मार्क ग्रीन हे देखील चर्चेत आहेत.
आम्हाला नवीन नवे सुचविली गेली असून अतिशय खुल्या आणि मेरिट वर आधारित नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल असे जागितक बँकेच्या अधिकृत प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu