सरलेले २०१८ साल हे सामान्य गुंतवणूकदारासाठी तसं निराशाजनक होतं. त्यातही मिड आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये भरपूर नुकसान झालं. इन्फ्रा, बँकिंग आणि कन्झम्प्शन फंडांमध्येसुद्धा नुकसान सोसावं लागलं. आयएल अ‍ॅण्ड एफएस गोंधळामुळे डेट फंडसुद्धा तोटय़ात गेले. तर या सर्व घटनांमुळे आपण काही शिकलो का? हे तर नक्कीच शिकलो की, जेवढी मानतो तेवढी जोखीम क्षमता आपली नसते. दुसरे म्हणजे,

ध्येयानुसार गुंतवणूक, त्यानुसार गुंतवणूक पर्याय या अनुषंगाने केली नाही तर तोटा होऊ शकतो.

प्रत्येक गुंतवणुकीचं एक चक्र असतं. ती गुंतवणूक आधी शांत असते, मग ती हळूहळू वर येते, मग ती प्रचंड वेगाने वाढते, त्यानंतर खाली येते, आणि मग पुन्हा शांत होते. तेव्हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सगळेच पर्याय एकाच प्रकारचे असले तर तुम्हाला सदाबहार गुंतवणुकींचा आनंद नाही घेता येणार. उदाहरण घ्यायचं झालं तर मागील १० वर्षांचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा हे लक्षात येतं की, जेव्हा स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड धावत होते तेव्हा लार्जकॅप फंड संथ गतीने वाढत होते. आणि जेव्हा फार्मा फंडांनी चांगली कामगिरी दाखवली तेव्हा इतर इक्विटी फंड शांत होते. तसेच डेट फंडांचेसुद्धा कामगिरीचे दिवस असतात. हे चक्र ज्याला समजतं, तो मार्केटमधल्या तेजी-मंदीचा चांगला फायदा घेऊ  शकतो.

तर यावर्षी असं ठरवा की गुंतवणूक ही ध्येयाशी निगडित करणार आणि विसंगत गुंतवणूक सुधारणार!

सूचना:

१. जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मगच गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

२. या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस येथे केलेली नाही.

३. सर्व म्युच्युअल फंड हे ‘रेग्युलर ग्रोथ’ पर्यायातील आहेत.

४. यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.

५. म्युच्युअल फंडचे एग्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर – यांचा विचार या सदरामध्ये केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.

मात्र योग्य आर्थिक सल्लागाराच्या मदतीशिवाय काहीही ठरवू नका !!

अभिप्राय द्या!