केंद्र सरकार लवकरच ऍक्सिस बँक, आयटीसी आणि एल अँड टी मधील आपला हिस्सा विकणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. स्पेसिफाईड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (एसयूयूटीआय) च्या माध्यमातून अर्थ खात्याचा एक्सिस बँक (9 .63 टक्के), आयटीसी (7.97 टक्के) आणि एल अँड टी मध्ये (1.80 टक्के) हिस्सा आहे.
एल अँड टी मधील आपली हिस्सेदारी विकण्यासाठी अर्थ खाते बायबॅक ऑफरची प्रतीक्षा करत आहे. तर, ऍक्सिस बँक आणि आयटीसी मधील हिस्सा विकण्यासाठी ‘ऑफ मार्केट डील’ चा आधार घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आम्ही बल्क किंवा ब्लॉक डीलद्वारे एक्सिस बँक आणि आयटीसीमध्ये भागभांडवल विक्रीसाठी खुले करणार असून, हे सर्व येणाऱ्या मूल्यमापनावर अवलंबून असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
2018-19 मध्ये निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून विविध कंपन्यांमधील आपला हिस्सा कमी करून 80 हजार कोटी रुपये उभारण्याचे सरकारने लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत 34 हजार कोटी रुपये उभारले गेले आहेत.

अभिप्राय द्या!