आयडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने नवा ‘आयडीएफसी ओव्हरनाईट फंड’ बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड डेट प्रकारातील फंड आहे. हा फंड 16 जानेवारी 2019 ला गुंतवणूकीसाठी खुला होतो आहे. तर 17 जानेवारी 2019 ही त्याची अंतिम मुदत आहे. कमी कालावधीसाठी ओव्हरनाईट व्याजदर आणि चलनाची तरलता अपेक्षित असलेल्या गुंतवणूकदारांनी छोट्या कालावधीसाठी या फंडात गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. 
 
विशेषत: काही दिवस किंवा विकेंडच्या काळात आपला पैसा गुंतवून त्यातून परतावा अपेक्षित असलेल्या गुंतवणूकरदारांसाठी हा फंड आहे. या फंडाला कोणताही एक्झिट लोड नाही. ज्या गुंतवणूकदारांकडे मोठ्या प्रमाणावर रोकडची उपलब्धता आहे अशांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळेच कॉर्पोरेट्स, वित्तसंस्था आणि मोठी रोकड असलेले गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूक करू शकतात. ‘आयडीएफसी ओव्हरनाईट फंडाचे व्यवस्थापन हर्षल जोशी सांभाळणार आहेत. 
 
जोशी आयडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे उपाध्यक्षसुद्धा आहेत. त्यांना म्युच्युअल फंड व्यवसायाचा मोठा अनुभव आहे. या एनएफओच्या कालावधीत म्हणजे 16 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान 1,000 रुपये प्रति युनिट या प्रमाणे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार आहे. त्यानंतर खरेदी विक्रीसाठी हा फंड 21 जानेवारीला खुला करण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu