आघाडीची आयटी कंपनी विप्रो लि. आपल्या शेअरधारकांना बोनस शेअर देण्याची शक्यता आहे. विप्रोच्या संचालक मंडळाची 17-18 जानेवारी 2019 ला बैठक होणार आहे. 18 जानेवारीला विप्रो डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. कंपनीने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. 17-18 जानेवारी 2019 ला होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील त्याचबरोबर गुंतवणूकदारांना चालू आर्थिक वर्षासाठी डिव्हिडंडही दिला जाण्याची शक्यता आहे.
शिवाय संचालक मंडळ भागधारकांना बोनस शेअर देण्याचीही शक्यता आहे. विप्रो ही देशातील आघाडीची आयटी कंपनी आहे. याआधी इन्फोसिस आणि टीसीएसने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. इन्फोसिसला 3,610 कोटी रुपयांचा तर टीसीएसला 8,105 कोटी रुपयांचा नफा तिसऱ्या तिमाहीत झाला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu