डिसेंबर 2018 अखेर इएलएसएस प्रकारातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत 27 टक्क्यांची घसरण झाली आहे. डिसेंबर अखेर इएलएसएसमध्ये 841 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली होती. तर डिसेंबर 2017 अखेर इएलएसएसमधील गुंतवणूक 1,166 कोटी रुपयांवर होती. अॅम्फीने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
मागील वर्षभरात शेअर बाजारात सुरू असलेले चढउतार, अस्थिरतेचे वातावरण यामुळे इक्विटी प्रकारात चांगला परतावा मिळालेला नाही. याचा परिणाम इएलएसएसमधील गुंतवणूकीवरही झाला आहे. इएलएसएस प्रकारातील गुंतवणूक मुख्यत: करबचतीच्या उद्देशाने केली जाते. ‘इक्विटीचा परतावाच नकारात्मक असल्यामुळे मागील वर्षभरात या प्रकारातून गुंतवणूकरदारांना अपेक्षित असलेला परतावा मिळू शकलेला नाही. त्याचबरोबर मागील वर्षभरात मुदतठेवींच्या व्याजदरांमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ झालेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या प्रकारातील गुंतवणूक कमी केलेली आहे’, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारातील म्युच्युअल फंडांच्या परताव्यातही वर्षभरात चांगलीच घसरण झालेली आहे. दरम्यान एसआयपीद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणूकीत मोठी वाढ झालेली आहे.
त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार एकरकमीऐवजी एसआयपीद्वारे इएलएसएस म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतील असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

अभिप्राय द्या!