आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाने ‘बाल भविष्य योजना’ हा एक नवा चिल्ड्रन्स फंड बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड फंड आहे. या फंडासाठी लॉक-इन कालावधी किमान पाच वर्षांचा किंवा अपत्याचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यतचा असणार आहे. यातील जी अट आधी पूर्ण होईल ती स्वीकारली जाणार आहे. हा एनएफओ 22 जानेवारी 2019 ला खुला होणार असून 5 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत आहे. या फंडाचे व्यवस्थापन अजय गर्ग आणि प्रणय सिन्हा करणार आहेत. या फंडातील गुंतवणूक, गुंतवणूकीच्या वेळेस 18 वर्षांपेक्षा वयाने कमी असणाऱ्या अपत्याच्याच नावे करता येता आहे. ज्याचे नावे गुंतवणूक केली जाणार आहे त्या अपत्याचे प्रतिनिधित्व त्याचे पालक करणार आहेत.
या फंडाची आणखी एक खासियत म्हणजे यात पालकांव्यतिरिक्त पाल्याचे आजोबा किंवा जवळचे नातेवाईक किंवा इतरांना गुंतवणूक करता येणार आहे. नातेवाईकाव्यतिक्त इतर व्यक्तीने केलेली गुंतवणूक अपत्याला दिलेले बक्षिस म्हणून समजली जाणार आहे. या फंडाद्वारे मुलांच्या शिक्षण, लग्नासारख्या दिर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करता येणार आहे. या फंडात गुंतवणूक करण्यासाठी दोन पर्यायसुद्धा देण्यात आले आहेत.
वेल्थ आणि सेव्हिंग्स असे हे दोन पर्याय आहेत. वेल्थ प्लॅनमध्ये 65 ते 100 टक्क्यांपर्यतची रक्कम इक्विटी प्रकारात गुंतविली जाणार आहे. तर उर्वरित रक्कम फिक्स्ड इन्कम प्रकारात गुंतविली जाणार आहे. तर सेव्हिंग्स प्रकारात 75 ते 90 टक्के रक्कम डेट आणि मनी मार्केट प्रकारात गुंतविली जाणार असून उर्वरित रक्कम इक्विटी प्रकारात गुंतविली जाणार आहे.

अभिप्राय द्या!