एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 243 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या नफ्याच्या तुलनेत एचडीएफसी एएमसीच्या नफ्यात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 195.1 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. एचडीएफसी एएमसीच्या व्यवस्थापनाखालील एकूण गुंतवणूक डिसेंबरअखेर 3 लाख 29 हजार 100 कोटी रुपयांवर पोचली आहे. 
 
31 डिसेंबर 2017 अखेर कंपनीच्या व्यवस्थापनाखालील गुंतवणूक 2 लाख 93 हजार 300 कोटी रुपये इतकी होती. कंपनीच्या एकूण उत्पन्नात 7.61 टक्क्यांची वाढ ते 532.94 कोटी रुपयांवर पोचले आहे. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे

अभिप्राय द्या!

Close Menu