विविध आकारमान आणि वैशिष्टय़ांसह नलिकांची निर्मिती करणाऱ्या सुराणी स्टील टय़ूब्ज लिमिटेड भांडवली बाजारात प्रवेश करून गुंतवणूकदारांना अजमावणार आहे. कंपनीच्या समभागांची प्रारंभिक सार्वजनिक विक्री २५ जानेवारीपासून सुरू होणार असून ती २९ जानेवारीला बंद होत आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एनएसई इमर्ज’ या छोटय़ा कंपन्यांसाठी असलेल्या बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी ही भागविक्री आहे. सुराणी स्टील टय़ूब्जचा प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या २४,८४,००० समभागांची प्रत्येकी ५१ ते ५२ रुपये किमतीदरम्यान विक्री करणार आहे. कमीत कमी २००० समभाग आणि त्यानंतर त्याच पटीत वाढीव समभागांची मागणी गुंतवणूकदारांना नोंदविता येईल.

कंपनी २० एनबी ते १०० एनबी या आकारांमध्ये आणि विविध विवरणांनुसार माइल्डस्टील नलिका (पाइप्स) उत्पादित करते. गुजरातमधील गांधीनगर येथील दहेगामस्थित उत्पादन प्रकल्पातून कंपनी वार्षिक २५,००० मेट्रिक टन क्षमतेने उत्पादन घेते.

अभिप्राय द्या!

Close Menu