कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने कॅनरा रोबेको स्मॉक कॅप फंड या खुल्या योजनेसाठी नवीन फंड प्रस्तावाची (एनएफओ) घोषणा केली. अन्य इक्विटी वर्गांच्या तुलनेत दीर्घकाळामध्ये अधिक मोबदला मिळवून देण्याची क्षमता असलेल्या स्मॉल-कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इक्विटींमध्ये स्मॉल कॅप कंपन्या या भविष्यकाळातील संभाव्य मिड / लार्ज कंपन्या समजल्या जातात.
हा एनएफओ २५ जानेवारी रोजी खुला झाला असून, ८ फेब्रुवारी रोजी बंद होणार आहे. एकूण निधीचा (कॉर्पस) किमान ६५ टक्के भाग स्मॉल कॅप कंपन्यांच्या इक्विटी व इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवण्याचा या योजनेचा प्रस्ताव आहे. पोर्टफोलिओच्या दुसऱ्या भागाच्या (बिटा) व्यवस्थापनासाठी ३५ टक्क्यांपर्यंत भाग विभाजित करून मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवला जाईल.