भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा गैरव्यवहार डीएचएफएल या एनबीएफसी कंपनीत झाल्याचा खळबळजनक दावा कोब्रापोस्ट या वृत्तसंस्थेने केला आहे. यानंतर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये  भीतीचे वातारण तयार होऊन सकारात्मक व्यवहार करत असलेला भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला.
आज, कोब्रापोस्ट या संकेत स्थळाने दिलेल्या माहितीनुसार डीएचएफएल समूहामध्ये ३१ हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असून कंपनीच्या प्रवर्तकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बनावट कंपन्यांच्या आधारे कोट्यवधींची अफरातफर केली आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी 21,477 कोटी रुपये कर्ज आणि गुंतवणुकीच्या नावाखाली सरळसरळ बनावट खात्यांमध्ये वर्ग केल्याचा दावा कोब्रापोस्टने केला आहे. यानंतर डीएचएफएलच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त पडझड होऊन कंपनीचा शेअर 172.35 वर स्थिरावला.
आयएल अँड एफएस, पीएनबी, विजय मल्ल्या, सनफार्मा, व्हिडीओकॉन-चंदा कोचर, एस्सेल समूह असे गैरव्यवहाराची तसेच आर्थिक संकटाची प्रकरणे समोर असतानाच त्यात आता डीएचएफएलचे नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्वांमध्ये डीएचएफएलचे गांभीर्य आणखीनच जास्त आहे कारण कोब्रापोस्टने केलेल्या दाव्यानुसार हा भारतातला आतापर्यंतचा सर्वात मोठा गैरव्यवहार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu