आघाडीच्या आणि मातब्बर समजल्या जाणाऱ्या वित्तीय कंपन्यांमधील गैरव्यवहारांनंतर आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्या अडचणीत आल्या आहेत. अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी एकत्रितरित्या 8,650 कोटी रुपये डीएचएफएल आणि समूहातील इतर चार कंपन्यांमध्ये गुंतवलेले आहेत. डीएचएफएल समूहातील या चार कंपन्यांमध्ये आधार  हाऊसिंग फायनान्स, एसेन्शियल हॉस्पिटॅली, एवान्स फायनान्शियल सर्व्हिसेस आणि वाधवान ग्लोबल कॅपिटल यांचा समावेश आहे. आयएलडएफएसमुळे संकटात आलेल्या एनबीएफसी क्षेत्रातील कंपन्या सावरत असतानाच आणि झी समूहाने आर्थिक संकटातून तात्पुरता मार्ग शोधल्यानंतर आता डीएचएफएलमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या कोब्रा पोस्टच्या आरोपांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे.  
 
आयएल अॅंड एफएस आर्थिक संकटात सापडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डीएचएफएलच्या बॉन्ड आणि कमर्शियल पेपरमधील गुंतवणूक अनेक म्यु्च्युअल फंड कंपन्यांनी काढून घेतली होती. त्यानंतर व्याजाची परतफेड करताना डीएचएफएलला मोठी कसरत करावी लागते आहे. डीएचएफएलने चांगले उत्पन्न मिळवून देणारी कर्जे विकल्यानंतरही कंपनीसमोरील आर्थिक संकट दूर झालेले नाही. डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीनंतर प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी डीएचएफएलमधील आपले 23 लाख शेअर विकत गुंतवणूक 0.73 टक्क्यांनी कमी करत 2.46 टक्क्यांवर आणली आहे. 

अभिप्राय द्या!

Close Menu