युनियन म्युच्यूअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी युनियन आर्बिट्राज फंड हा खुला फंड बाजारात आणला आहे. अतिशय कमी जोखीम आणि तीन महिन्यांपेक्षा अधिक गुंतवणुकीचा कालावधी असा दृष्टीकोन बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी प्रामुख्याने हा फंड आहे.
 
गुंतवणूकीस 30 जानेवारीपासून सुरु झालेला हा फंड 13 फेब्रुवारीपर्यंत खुला आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारीला हा फंड फेरखरेदीसाठी खुला होणार आहे. निफ्टीच्या फिफ्टी आर्बिट्राज इंडेक्समधील समभागांमध्ये या फंडातील निधी गुंतविला जाणार आहे. युनियन एएमसी हे युनियन म्युच्यूअल फंडांचे व्यवस्थापक आहे. समभागातील गुंतवणूकीची जबाबदारी ही विशाल ठक्कर तर डेटमधील गुंतवणूकीची जबाबदारी देवेश ठकार यांच्याकडे आहे. गुंतवणूकीनंतर एक महिन्यात युनिटची विक्री केल्यास 0.25 टक्के एक्झिट लोड आकारला जाणार आहे. या फंडातील गुंतवणूक प्रामुख्याने समभागांच्या स्पॉट आणि फ्युचर्स दरातील तफावतीचा फायदा हेरत केली जाईल. डेरीव्हेटीव्हजमध्येही अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या संधी हेरल्या जातील. या फंडासाठी गुंतवणूकीच्या विविध रणनिती असुन, कॅश फ्युचर्स आर्बिट्राजव्यतिरिक्त इंडेक्स, विविध कालावधीनुरुप ( कॅलेंडर) मिळणाऱ्या संधी, कंपन्यांच्या विविध घडामोडी आदी प्रकारच्या गुंतवणूक रणनिती वेळोवेळी वापरल्या जाणार आहेत.

अभिप्राय द्या!

Close Menu