डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे डीएसपी निफ्टी  50 इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड हे नवीन ओपन एण्डेड इंडेक्स फंड सादर करण्यात आले आहेत. याद्वारे, अनुक्रमे निफ्टी  50 इंडेक्स व निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स या फंडांची प्रतिकृती उपलब्ध होत आहे. या फंडासाठीचा एनएफओ कालावधी 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2019 असा ठरवण्यात आला आहे.
 
निफ्टी 50 इंडेक्स या फंडातर्फे भारतीय बाजारपेठेतल्या कॅपनुसार 50 अग्रणी कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेतला जातो. हा निर्देशांक विविध क्षेत्रातील बाजारपेठांमधल्या बड्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि योग्य वेळेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतो. निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स बाजारपेठेतील कॅपने मूल्यांकित केलेल्या 51 ते 100 समभागांची नोंद करून घेतो. भावी कालावधीत मोठ्या कॅप्स बनू शकतील, अशा कंपन्यांना मिळवण्याचा प्रयत्न ही हा फंड करतो. सेबीद्वारे परिभाषित केल्यानुसार, हे दोन्ही निर्देशांक मोठ्या कॅप स्पेसमध्ये कार्यरत आहेत.
 
इक्विटी बाजारपेठेत प्रवेश करू इच्छित असलेल्या गुंतवणूकदारांसाठी तसेच, ज्यांना कमी खर्चात बाजारपेठेचे ध्येय पूर्ण करायचे असेल, अशा प्रथम गुंतवणूकदारांसाठी हा फंड उपयुक्त आहे. विविध पोर्टफोलिओंमध्ये कोअर अॅलोकेशन जोडण्यासाठी विविध प्रकारचे गुंतवणूक पर्याय शोधणाऱ्यांना व अनुभवी गुंतवणुकदार शोधणाऱ्यांना या फंडामुळे फायदा होईल. डीएसपी निफ्टी 50 इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट 50 फंड गौरी सेकारिया यांच्यातर्फे व्यवस्थापित केले जातील.
 
डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स या कंपनीने 2017 मध्ये निष्क्रिय व्यासपिठाच्या माध्यमातून आपला पहिला फंड सादर केला. डीएसपी इक्वल निफ्टी 50 फंड या नावाने सादर करण्यात आलेला हा फंड म्हणजे निफ्टी  50 इंडेक्स फंडाचे अधिक स्मार्ट आणि विविधीकृत संस्करण होते. भांडवली बाजारपेठांमधील इक्विटी समभागांदरम्यान ज्या गुंतवणूकदारांकडे रोख रक्कम उपलब्ध होती, त्यांच्यासाठी गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देणारी डीएसपी ही दुसरी फंड कंपनी होती. डीएसपी लिक्वीड ईटीएफ या नावाने हे उत्पादन ओळखले जात असे.

अभिप्राय द्या!