आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवा ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रिटायरमेंट फंड’ बाजारात आणला आहे. ही एक ओपन एंडेड योजना आहे. यात पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी किंवा निवृत्तीपर्यतचे वय (यातील जे आधी येईल ते) अशी अट आहे. हा एनएफओ 7 फेब्रुवारीला खुला होत असून 21 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत आहे.
 
‘तुम्ही तरुण असता त्याचवेळेस तुमचे निवृत्तीनंतरचे नियोजन करणे जास्त योग्य असते. म्युच्युअल फंडात दिर्घकाळासाठी गुंतवणूक करून निवृत्तीपर्यत चांगला निधी उभा करता येतो. त्याचबरोबर तुम्हाला एसडब्ल्यूपीसारखा पर्यायसुद्धा वापरता येतो.
 
‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रिटायरमेंट फंडात चार पर्याय देण्यात आले आहेत.
 
a)प्युअर इक्विटी प्लॅन – 25 ते 45 वयोगटातील गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय सुचवला असून दिर्घकालीन परतावा मिळवण्याचे उद्दीष्ट यातून साध्य करता येणार आहे.
 
b) हायब्रीड अग्रेसिव्ह प्लॅन – 46 ते 50 वयोगटातील गुंतवणूकदारांना हा पर्याय सुचवण्यात आला असून गुंतवणूक प्रकारातील विभागणीद्वारे चांगला परतावा मिळवता येणार आहे.
 
c) हायब्रीड कॉन्झर्वेटीव्ही प्लॅन – 51-56 वयोगटातील गुंतवणूकदारांना हा पर्याय सुचवण्यात आला असून डेट आणि मनी मार्केटद्वारे यातून नियमित उत्पन्न मिळवता येणार आहे.
 
d) प्युअर डेट प्लॅन – 56 ते 60 वयोगटातील गुंतवणूकदारांना हा पर्याय सुचवण्यात आला असून डेट आणि मनी मार्केटमधील वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून उत्पन्न मिळवता येणार आहे.
 
इक्विटी प्रकाराचे फंड व्यवस्थापन म्रिनाल सिंग आणि अश्विन जैन करणार आहेत. तर डेट प्रकाराचे व्यवस्थापन मनीष भाटीया आणि अनुज टाग्रा करणार आहेत. या फंडात गुंतवणूक करण्यासाठी किमान 5,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

अभिप्राय द्या!