‘आगामी निवडणुकीतही देशात पुन्हा नरेंद्र मोदीच सत्तेवर येतील आणि यंदाच्या निवडणुकीत भाजपाला मिळणाऱ्या जागांचा आकडा हा सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरेल’, असे राकेश झुनझुनवाला यांनी म्हटले आहे.
गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला हे बुधवारी टायकॉन परिषदेत सहभागी झाले होते. दलाल स्ट्रीटवरचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून त्यांना ओळखले जाते. झुनझुनवाला म्हणाले, भाजपा आगामी निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देईल. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदीच विजयी होतील, असे त्यांनी सांगितले.