गेल्या शुक्रवारी “निफ्टी’ 10,933 अंशांवर बंद झाला होता. या आठवड्यासाठी 10,840 व 11,090 अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. 10,840 अंशांच्या खाली घसरला; तर पुढे 10,690 अंशांपर्यंत जाऊ शकतो. जर 11,090 अंशांच्या वर एक दिवस टिकला तर पुढे 11,200 अंशांपर्यंत वाढू शकतो. सध्या चढ-उताराचा निर्देशांक 15.57 अंशांवर व पुट/कॉल गुणोत्तर 1.27 अंशांवर असून, हे बाजारवाढीत राहण्याचे संकेत देत आहेत. खालच्या बाजूला “निफ्टी’ फार तर 10,840 अंशांपर्यंत घसरण्याची शक्‍यता आहे. “बॅंक निफ्टी’साठी 27,000 व 27,500 अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. “निफ्टी’ या आठवड्यात 10,840 अंशांवरून वरच्या दिशेने वाढण्याची शक्‍यता अधिक आहे; परंतु सध्या बाजारात जोश नसून, पुढील तीन महिने बाजाराची वाढ हळूहळू होत राहील व वाढीनंतर नफावसुलीही होत राहील

अभिप्राय द्या!

Close Menu