बीएनपी पारिबास म्युच्युअल फंडाने बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड बाजारात आणला आहे. या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी खुला झाला असून फंडाचा एनएफओ 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान खुला असणार आहे.
कार्तिकराज लक्ष्मणन आणि अभिजित डे इक्विटी फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत तर मयांक प्रकाश डेट फंडातील गुंतवणूक सांभाळणार आहेत. या फंडासाठीची किमान गुंतवणूक रक्कम 5,000 रुपये आहे. बेंचमार्क क्रायसिल हायब्रीड 35+65 नुसार इक्विटी आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.  या फंडसाठी एन्ट्री लोड लागू असणार नाही मात्र 24 महिन्यांच्या आत जर या योजनेतून गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले तर 1 टक्का एक्झिट लागणार आहे.
डायनॅमिक इक्विटी फंड बाजारमूल्य वाढले की इक्विटीमध्ये कमी प्रमाणात गुंतवतात. याउलट बाजारमूल्य घसरले की इक्विटीतील गुंतवणूक वाढवतात.

अभिप्राय द्या!

Close Menu