शेअर बाजारात गुंतवणूक करून कोट्याधीश झालेले आहेत त्याचप्रमाणे होत्याचे नव्हते झालेले देखील अनेक आहेत. अस्थिरता हाच शेअर बाजारातील वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचा घटक आहे. मात्र, या अस्थिरतेला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. एखाद्य कंपनीचा शेअर उसळला कि भरपूर कमाई होते मात्र, दुसरीकडे अचानक आलेल्या घसरणीने अनेक गुंतवणूकदार एका दिवसात रस्त्यावर येतात. हे टाळण्यासाठी नियामक संस्था सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) महत्वपूर्ण पावले उचलण्याच्या तयारी आहे.
सेबीने सोमवारी यासंदर्भात एक प्रस्ताव आणला आहे. त्यानुसार, डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटचा भाग असलेल्या स्टॉकमध्ये सर्किट फिल्टर्सचा समावेश केला जाणार आहे. जेणेकरून अचानक आलेल्या घसरणीचा गुंतवणूकदाराला फटका बसू नये. ही मर्यादा 2 ते 20 टक्यांपर्यंतची असणार आहे. म्हणजेच कितीही मोठी पडझड झाली तरी गुंतवणूकदाराचे 20 टक्क्यांपेक्षा जास्त मोठे नुकसार होणार नाही. परिणामी त्याला सावरायला संधी मिळेल.
सेबीने हा प्रस्ताव सादर करताना मागील सहा महिन्यांची आकडेवारी सादर केली आहे. त्यानुसार, तब्बल 40 शेअर्समध्ये एका दिवसात 20 टक्क्यांपेक्षा मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तर, त्यातील 29 स्टॉकची घसरण 30 टक्क्यांपर्यंत झाली आहे.

अभिप्राय द्या!